कळवण – तालुक्यातील रवळजी येथील तरूण शेतकरी प्रकाश निकम याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. स्वतःच्या शेतात रविवारी (१६ ऑगस्ट) सागाच्या झाडाला गळफास घेऊन निकम यांनी आत्महत्या केली. निकम हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीबरोबरच अन्य कामेही ते करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक संकटात होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.