कळवण – कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शिधापत्रिका मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो. हजारो रुपये घेऊन बोगस शिधापत्रिका या शासन निर्देशानुसार नसून शिधापत्रिकाबाबत पिळवणूक होऊ नये यासाठी महसूल विभागाच्या सहकार्य व मार्गदर्शक सूचनांनुसार कळवण तालुक्यात शिबिर घेऊन शिधापत्रिका वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार यांनी दिली.
महाराजस अभियान अंतर्गत पाटविहीर येथे महसूल विभागाच्या सहकार्यातून शिधापत्रिका शिबीर घेऊन शिधापत्रिका व पाटविहीर येथील नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांच्या लाभार्थीना नुकसान भरपाईचे धनादेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौं जयश्री पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
तहसीलदार बी ए कापसे, पंचायत समिती सभापती सौं मनीषा पवार, उपसभापती विजय शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समिती सदस्य सौं मीनाक्षी चौरे, रायुकॉ तालुकाध्यक्ष संदीप वाघ आदी होते.
यावेळी पाटविहीर येथील ९० नागरिकांना नवीन पिवळी व केसरी शिधापत्रिका, शिधापत्रिकाची दुरुस्ती, नूतनीकरण, दुय्यम, नाव समाविष्ट केलेल्या शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले.तहसीलदार बी. ए. कापसे यांनी महाराजस्व अभियान कळवण तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याच्या आमदार नितीन पवार यांनी सूचना दिल्या आहे त्यामुळे नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
शिधापत्रिकाबाबत निर्माण झालेल्या अडचणी गावागावात महसुल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी कळवण तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत प्रयत्न केले जाणार असून प्रत्येकाला शिधापत्रिका ही मिळेल ,शासनाची फी व्यतिरिक्त जास्त पैसे कुणालाही देवू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांनी यावेळी केले. यावेळी पाटविहीरचे सरपंच उत्तम जगताप, उपसरपंच सुरेश जगताप,शिवाजी चौरे,काशिनाथ जोपळे, श्रावण पालवी, अभिमन जगताप, वसंत बागूल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.