कळवण – कळवण या आदिवासी बहुल भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे (स्वेटर ) वाटप करून युवासेना जिल्हाध्यक्ष आदित्य केळकर यांचा साजरा केलेला वाढदिवस एक स्त्युत्य उपक्रम असून असेच कार्य संपूर्ण जिल्ह्यात युवासेनेने उभे करावे असे आवाहन युवासेना संपर्कप्रमुख निलेश गवळी यांनी केले.
नाशिक जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख आदित्य केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त देसराणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते चौथीतील ६५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले, यावेळी गवळी बोलत होते. पुढे बोलतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे व पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना आजही २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत आहे, याच शिकवणीनुसार आज कळवण तालुका युवासेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे यांनी ऐन थंडीत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून मायेची उब दिली आहे. तसेच राज्यात व देशात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताची गरज ओळखून गावागावात रक्तदान शिबिरे घ्यावीत व तरुण वर्गाने रक्तदान करावे असे आवाहन यावेळी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायण हिरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केले. या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, भाजपाचे महेंद्र हिरे, पंडित पवार, उपतालुकाप्रमुख विनोद भालेराव, युवासेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, कळवण शहर अधिकारी सुनिल पगार, आदींसह शिवसेना पदाधीकारी, शिवसैनिक व देसराणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
–
म्हणून विद्यार्थ्यांना वाटले स्वेटर
कळवण हा आदिवासी बहुल तालुका असून येथील असंख्य आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेत मजूर म्ह्णून काम करतात. अशा गरजूंचे मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात. त्यांना एन थंडीत कुडकुडत शाळेत जावे लागते. म्हणून देसराणे येथील शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटले.
मुन्ना हिरे , युवासेना तालुका अधिकारी