– कळवण प्रकल्पातील अधिकारी,शासकीय, अनुदानित मुख्याध्यापक, शिक्षक, वसतिगृह अधीक्षक व कर्मचारी यांचे दातृत्व-
– आमदार नितीन पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद
कळवण – कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनसह इतर कोविड सामुग्रीची गरज वाढल्याचे कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत असलेल्या कार्यालयातील अधिकारी,शासकीय व अनुदानीत शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक ,वसतिगृहातील अधीक्षक, कर्मचारी यांनी 11 लाख 11 हजार रुपयांचा निधी संकलन करुन आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
कळवण आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक, अधीक्षक, कर्मचारी यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पधिकारी विकास मीना यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.आता त्या निधीतून कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड तालुक्यातील कोविड सेंटरला जम्बो सिलेंडर, पीपीई कीटसह आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध होणार असल्यामुळे या तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
आमदार नितीन पवार यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक, अधीक्षक, कर्मचारी यांचा निधीचा धनादेश स्वीकारून आभार मानले असून निधीचा धनादेश कळवणचे तहसीलदार बी ए कापसे यांच्याकडे सुपूर्द केला.
त्यातून कळवण तालुक्यातील कोविड संदर्भातील आवश्यक साधनसामुग्रीसाठी 3 लाख 25 हजार रुपये, सुरगाणा तालुक्यासाठी 3 लाख 90 हजार रुपये, सटाणा तालुक्यासाठी 2 लाख रुपये,देवळा तालुक्यासाठी 89 हजार रुपये, मालेगाव तालुक्यासाठी 79 हजार रुपये तर चांदवड तालुक्यासाठी 28 हजार रुपये निधी कोविड आवश्यक साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी देण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी यावेळी केली.
कळवण प्रकल्पात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरसह आवश्यक साधनसामुग्रीची मदत करावी असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी मागील सप्ताहात केले होते.
आमदार पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कळवण प्रकल्पातील बी एन देवरे, एस जे बावा, एन एस मनीयार,पी डी कापडणीस, बी एच कापडणीस या अधिकारी,शिक्षक, अधीक्षक, कर्मचारी यांच्या प्रतिनिधीनी पुढाकार घेऊन कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपसण्याची भूमिका घेतली.
कळवण प्रकल्पातील अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक, अधीक्षक, कर्मचारी यांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन अवघ्या दोन दिवसात 11 लाख 11 हजार रुपयांचा निधी संकलन केला असून निधीचा धनादेश आमदार पवार यांच्याकडे सुपूर्द केला.आता त्या निधीतून कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड तालुक्यातील कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरसह मशीन,आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे,पी एन वडजे, पी के जोपळे, बी एल मेंगडे,एस पी कनोज, एच आर खैरनार, ए जी देवरे, एल जी गोसावी, एन वाय ठाकरे, आर डी पाटील, ए एल निकम, प्रशांत कोकरे,आर टी निकम,बी एस पाटील,एस के सोनवणे,एस पी मोरे आदी उपस्थित होते.