कळवण – कोरोनामुळे मार्चपासून सर्वच ठप्प असल्याने नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख सेवानिवृत्त झालेत मात्र त्यांचे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम घेता झाले नाहीत. पण, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांच्या पुढाकारातून पंचायत समिती शिक्षण विभागाने कोरोना कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सन्मान सोहळा घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. शशिकांत पवार म्हणाले की, शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रती कार्याची मोजपट्टी वेगळी आहे. शिक्षकी पेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक मोतीराम शिंदे , कृष्णाजी बच्छाव, कळवण येथील मुलींच्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र पगार, आर.के.एम.विद्यालयाचे प्राचार्य एल.डी.पगार उपस्थित होते. यावेळी दोन वर्ष यशस्वी कामकाज केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांचा शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, पेन्शनर असोसिएशन व शिक्षक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शिक्षण विस्तारअधिकारी दिलीप पवार, केंद्रप्रमुख रमेश शिंदे, जिभाऊ निकम, पी.के.आहेर, कळवण व देवळा शिक्षक पतसंस्थेचे संचालक भास्कर भामरे, स्वाती शिरसाठ गौरवोद्गारपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शालेय पोषण आहार अधिक्षक सय्यद, शिक्षण विस्तारअधिकारी विजय बागुल, संजय चव्हाण, परशराम महाले, शितल कोठावदे, नाशिक शिक्षक बँकेचे संचालक प्रदीप खैरनार, अभोणा शिक्षक पतसंस्थेचे संचालक देविदास आहेर, दादाजी देवरे, किशोर सुर्यवंशी, अभिनंदन धात्रक, विलास पाटील, रविंद्र निकम, सुरेश शेवाळे, देविदास जाधव, सुनिता गाढवे, मयुरी जाधव आदींसह मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.एम.महाडीक व समाधान सोनवणे यांनी केले. वर्षा बच्छाव यांनी आभार मानले.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख
केदा पगार (मोकभणगी), बापू बहिरम (नांदुरी), मंदा जाधव (पाळे).
सेवानिवृत्त मुख्याध्यापक –
रामचंद्र अहिरराव (पिळकोस), नारायण बंगाळ (देवळीवणी), कांतीलाल ढुमसे (देसगाव), रविंद्र देशमुख (निवाणे), लिलावती सुर्यवंशी (गणोरे), अंजना कोठावदे (शिरसमणी).
सेवानिवृत्त उपशिक्षक – निंबा जाधव (जामशेत), रोहिदास चव्हाण (वडपाडा), रामदास बागुल (मोहनदरी), हिराबाई जाधव (बेलबारे), यमुना पवार (कळवण मुली), लता जगताप (अभोणा), मिना पवार (देसगाव), निर्मला वळींकर (रामनगर)