कळवण – कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कळवण विविध कार्यकारी संस्थेचे माजी सभापती शंकरराव निकम यांच्या पत्नी सौं शोभाताई शंकरराव निकम यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान उपसभापती हेमंत बोरसे यांनी आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतीपदासाठी बाजार समितीचे सभापती व जिल्हा बॅक संचालक धनंजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात सहकार विभागाच्या निर्देशानुसार सहाय्यक निबंधक के. डी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात येऊन उपसभापतीपदांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत सर्वानुमते उपसभापतीपदासाठी सौं शोभाताई शंकरराव निकम यांच्या नावावर एकमत झाल्याने निर्धारित वेळेत उपसभापतीसाठी सौ. शोभाताई निकम यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित उपसभापती सौ. शोभाताई निकम यांचा कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार आदींनी यावेळी सत्कार केला.
उपसभापती निवडीसाठी आयोजित बैठकीस मावळते उपसभापती हेमंत बोरसे, संचालक सुनील देवरे, हरिश्च॔द पगार, अॅड मनोज शिंदे, सुनील महाजन, रामचंद्र गायकवाड , विष्णु बोरसे, बाळासाहेब वराडे, रमेश पवार, मधुकर जाधव, डी एम गायकवाड, ज्ञानदेव पवार, बाळासाहेब वराडे, सौ वानूबाई पवार आदी संचालक उपस्थित होते.
निवडीप्रसंगी के के शिंदे, शंकरराव निकम, खंडेराव निकम,दादाजी निकम, सुनील पगार, देवा शिंदे, राजेंद्र पगार, छगन पगार, दादा निकम, सुरेश निकम, अविनाश पगार, जयेश पगार, अतुल पगार, मनोज पगार, साहेबराव निकम आदीसह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी बांधवांचे हित जोपासणार-
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांना सौजन्य अन सन्मानपूर्वक वागणूक दिली जात असल्याने शेतकरी बांधवाचे हित जोपासणारी बाजार समिती म्हणून कळवण बाजार समीतीची ओळख आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे हित अधिक हित जोपासण्यासाठी प्राधान्य देणार
-सौ. शोभाताई निकम ,उपसभापती कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती