कळवण – कळवण तालुक्यातील कळवण शहर ,अभोणा,सप्तशृंगी गड व नवीबेज येथे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अभोणा, नवीबेज, सप्तश्रुंगी गड येथे स्थानिक नागरिक, पदाधिकारी व प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्यात 171प्रतिबंधित क्षेत्र असून आजमितीस 393 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण तअसून कळवणमध्ये 138 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. नियमांचे पालन केले नाही म्हणून कळवणमध्ये 313 व अभोण्यात 177 व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई केली आहे.
कोरोना चाचणीची होणारी वाढ, मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिन्गचे पालन न करणे, लग्न कार्य, इतर सामाजिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कळवण तालुक्यात 171 ठिकाणचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र ( कन्टेन्मेंट झोन ) म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे पथके तयार करुन तैनात करण्यात आले आहे. शिवाय रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य शासनाने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून या यंत्रणेत नगरपंचायत अधिकारी , कर्मचारी , आरोग्यसेवक , सेविका , शिक्षक , आशासेविका , तलाठी , ग्रामसेवक आदींचा समावेश केला आहे .
कळवण तालुक्यात आजमितीस 393 रुग्ण ऍक्टिव्ह असून कळवण नगरपंचायत हद्दीत 138 जण ऍक्टिव्ह आहेत .कळवण शहरात 32 प्रतिबंधित क्षेत्र असून ,तालुक्यात तब्बल 171 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून सप्तश्रुंगीगड,अभोणा व नवीबेज येथे लॉकडाउनचा निर्णय स्थानिक यंत्रणेने घेतला आहे. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे लसीकरण सुरु आहे. मानूर येथे कोव्हीड केअर सेंटर तर अभोणा येथे डेडीकेटेड कोविड सेंटर कार्यरत आहे. तालुक्यात गावपातळीवर व कळवण शहरात स्वच्छता मोहीम हाती घेऊन जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे.
तालुक्यात आतापर्यंत 1149 कोरोना बाधित रुग्ण आढळली असून आज त्यात 19 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. कळवण नगरपंचायत हद्दीत 518 कोरोना बाधित आढळून आले असून तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात 621 कोरोना बाधित आढळून आले आहेत. आजमितीस मानूर कोविड केअर सेंटरमध्ये 35 रुग्ण ऍक्टिव्ह असून अभोणा येथील डेडीकेट कोविड सेंटरमध्ये 28 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.330 कोरोना बाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना आजार बरा होत असून मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण बरे होत आहेत.तालुक्यात सध्या 393 कोरोना बाधित रुग्ण ऍक्टिव्ह असून 177 स्वब प्रलंबित आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांनी दिली
कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत 300 व्यक्तीवर कोरोना संसर्ग नियमांचे पालन केले म्हणून कारवाई करण्यात आली आहे.नियमांचे पालन केले नाही नागरिकांकडून कळवण पोलिसांनी 20 हजार रुपयाचा दंड वसुल करुन दंडात्मक कारवाई केली. मास्क वापरला नाही, नियमांचे पालन केले म्हणून नागरिकांना 200 रुपये दंड केला तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा फरक पडत नसल्याने कळवण पोलिसांनी कठोर पाऊले उचलत नवीबेज व सप्तश्रुंग गडावर लॉकडाऊन असतांना नियमांचे पालन केले नाही म्हणून 13 व्यक्तीवर 188 प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केली.
अभोणा शहरात कोरोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी शासनाच्या कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात नागरिकांनी धन्यता मानली. अभोणा पोलिसांनी कठोर निर्णय घेऊन वेगवेगळ्या कलमाखाली 177 व्यक्तीवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीकडून 65 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.