आमदार नितीन पवार व कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सहकार्यातून उपक्रम
….
कळवण – कळवण शिक्षण संस्था संचलित आरकेएम माध्यमिक विद्यालयात शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यालयाचे पाचवी ते आठवी या वर्गाचे कामकाज बुधवारपासून सुरू झाले.आमदार नितीन पवार व कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सहकार्यातून विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक किट व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार, संचालक विश्वनाथ व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण बाजार समितीचे सचीव रविंद्र हिरे, प्राचार्य एल डी पगार,पर्यवेक्षक एन डी देवरे, पी एम महाडीक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक किट वाटप करण्यात आले.
साधारण गेल्या दहा महिन्यांपासून पूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींना मोठा फटका बसला होता. परंतु, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेत आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश काढल्याने आज २७ जानेवारी रोजी शाळा सुरू झाली. याप्रसंगी आलेल्या विद्याथ्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या ७० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यालयाचे पाचवी ते आठवी या वर्गाचे कामकाज आजपासून सुरू झाले.
शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. सॅनिटायझर वापर , फिजिकल डिस्टन्स यांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला. तसेच फिजिकल डिस्टंसिंग , सॅनिटायझर यांचा वेळोवेळी वापर करा अशा सूचना विद्यालयातर्फे देण्यात आल्या. जर एखाद्या विद्यार्थ्यास सर्दी, खोकला, ताप या बाबी निदर्शनास आल्यावर त्याने त्याच्या पालकांना सांगून त्वरित डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे ; अशा सूचना शाळेतील प्राचार्य एल. डी. पगार व शिक्षक बंधू यांनी विद्यार्थ्यांना दिल्या .