कळवण – केंद्र सरकारच्या आधारभूत योजने अंतर्गत नासिक जिल्ह्यात कळवण, पेठ, सुरगाणा दिंडोरी या तालुक्यातील २०२०-२१ मधील धान खरेदी सुरू असून धान्याची वाढती आवक बघता. त्या धान्याच्या साठवणुकीसाठी अधिकची गोदामे उपलब्ध नाही. त्यामुळे गोदामांमधील साठवणूक केलेल्या धान्याची जर भरडाई त्वरित केली तर त्या धान्य गोदामात अधिकच्या खरेदी केलेल्या धान्यास जागा उपलब्ध होऊ शकेल. सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान असल्याने त्याची खरेदी होणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यातील या धानाच्या भरडाईस लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी जेणेकरून गोदामांमधील साठवणूक कमी होऊन नवीन धानास जागा उपलब्ध होईल. अशी मागणी पत्राद्वारे खा डॉ भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना भेटून केली आहे.