सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन
कळवण – ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत शासनाने अघोषित संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले असून त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. संपूर्ण कालावधीमध्ये अशाच प्रकारे सूट देण्यात आल्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन अशी परिस्थिती आहे.त्यामुळे शासनाने लागू केलेल्या अघोषित लॉकडाऊनला कळवण तालुका भाजपाने विरोध केला असून परिस्थितीनुसार नियम शिथील करण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे केली.
भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार डॉ अनिल महाजन, संदीप अमृतकार, सचिन सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी,व्यावसायिक व कामगार वर्गाचा आर्थिक कणा मोडला गेला. पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण करुन व्यापारी,व्यावसायिक व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आणली आहे मागील लॉकडाऊनच्या संकटातून सावरत असताना पुन्हा व्यापारी वर्ग उभे राहण्याची तयारी करीत होते, कामगारांच्या हाताला काम मिळत होते.
अचानक अघोषित लॉकडाऊन लागल्यामुळे संपूर्ण व्यापारी व्यावसायिक व कामगार वर्ग हादरला आहे बँकेचे कर्ज, वीजबिल इत्यादी प्रमुख देणे असतानाही मध्ये राज्य शासनाने सरकारने व स्थानिक प्रशासनाने व्यापा-यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत, वीजबिल व कुठल्याही करात सवलत, व्याजात सवलत दिली नाही दिली.
अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली असून कळवणमध्ये अनेक छोटे-मोठे व्यापारी आहे त्यात काही दिवसांपासून आठवडे बाजार बंद केल्यामुळे बहुतेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत या सरकारने लॉकडाऊन घोषित केला हे निव्वळ दिशाभूल केली आहे. सरकारला व्यापारी वर्गाशी घेणे देणे नाही, करोनावर मात करण्यासाठी ठराविक निर्बंधाची गरज असतांना स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन व्यापारी व्यवसायिक वर्गाला दिलासा मिळेल अशा निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
प्रमुख मागण्या –
• विविध धार्मिक सण उत्सव येत असून संपूर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे
• किमान सोशल डिस्टिंग व मास्कचा व सॅनिटायझर, लस कोविड टेस्ट घेऊन सकाळी9 ते 6 सायंकाळी पर्यंत व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी
• पोलीस व स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये
• दि ४ एप्रिल २०२१ चेन बेर्किग आदेश कॉलम नंबर ५ (ब) प्रमाणे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना शासनाने विशेष अधिकार दिलेला आहे त्या अनुसरण आपला अधिकार वापर करून कळवण विभागातील बाजारपेठा विशेष बाब म्हणून सूट द्यावी.