कळवण- डांग सेवा मंडळ नाशिक संचालित कला महाविद्यालय अभोणे येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.रवींद्र पगार यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. रवींद्र पगार यांनी ‘भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्यांचा भाषिक अभ्यास’ या विषयावर संशोधन संशोधन करून शोधकार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. साहित्यामध्ये भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर हे दोघं अतिशय महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. दोन्ही कादंबरीकारांनी आपल्या कादंबऱ्यांच्या आशय आणि अभिव्यक्ती मधून एक मानदंड निर्माण केला. मातब्बर कादंबरीकार यांच्या कादंबऱ्यांचा भाषिक अंगाने अभ्यास करण्याचे एक मोठे आवाहन प्रा. पगार यांनी या संशोधनातून सिद्ध केले.
विद्यापीठाच्या अधिष्ठता डॉ. चेतना सोनकांबळे अध्यक्षतेखाली त्यांची मौखिक परीक्षा संपन्न झाली. त्यांना प्रा. डॉ विजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. बहिःस्थ पर्यवेक्षक म्हणून प्रा.डॉ. तुषार चांदवडकर होते. त्यांना पीएचडी मिळाल्याबद्दल डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा हेमलताताई बीडकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे, सचिव मृणालताई जोशी, प्राचार्य डॉ. एस. आर. निकम,शेखर जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.