नाशिक – कल्याण गायन समाज, दिनकर संगीत विद्यालय व म्हैसकर कला अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाईन हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेत नाशिकचा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आरएच सपट इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी केतन अनिल इनामदार याने प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत देशभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर परदेशात राहणारे काही स्पर्धकही यात सहभागी झाले होते.
या स्पर्धेसाठी दोन राऊंड झाले होते. पहिल्या राऊंडमध्ये अंतिम स्पर्धेसाठी १५ जणांची निवड करण्यात आली होती. त्यात केतनने हे यश मिळवले. ख्याल गायन साठी झालेल्या या स्पर्धेत केतनने मिळवलेले हे यश मोठे असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. त्याने या यशाचे श्रेय गुरु पंडित मकरंद हिंगणे यांना दिले आहे.
ही स्पर्धा १६ ते ४० वर्षे वयोगटासाठी होती. त्यासाठी प्रथम पारितोषिक पाच हजार रुपयाचे होते. दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. अतिशय दर्जेदार असलेल्या या स्पर्धेत केतनने मिळवलेले हे यश मोठे असल्याचे संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी सांगितले. केतनला या स्पर्धेच्या तयारीसाठी आई शुभदा इनामदार (बीएसएनच्या निवृत्त कर्मचारी) यांनी मोठे सहकार्य केले.
https://drive.google.com/file/d/1LVb96Her–5kDAzfRrrii54ZC4_SAMh1/view?usp=drivesdk