नवी दिल्ली – कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला झालेला मोठा आघात पाहता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कररचनेत बदल केला जाण्याची मोठी आशा होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी कराच्या रचनेत कुठलाही बदलन करण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे प्राप्तिकर दात्यांचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा कर रचनेत सवलत मिळेल, अशी मोठी खात्री बाळगली जात होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी करदात्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
गेल्या वर्षीचीच कररचना
यंदाही गेल्या वर्षी प्रमाणेच आयकर भरावा लागणार आहे. त्यामुळे २.५ लाखापर्यंत कुठलाही कर लागणार नाही. २.५ लाख ते ५ लाख या उत्पन्नावर ५ टक्के कर असेल. ५ ते ७.५ लाख उत्पन्नावर १० टक्के कर, १० ते १२.५ लाख उत्पन्नावर २० टक्के कर, १२.५ ते १५ लाख उत्पन्नावर २५ टक्के कर आणि १५ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागणार आहे.