बंगळूरू : कर्नाटकच्या राज्य विधानपरिषदेचे उपाध्यक्ष एस.एल. धर्मगौडा यांचा मृतदेह चिक्कामागलुरूमधील कदूरजवळ रेल्वे रुळावर सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही, परंतु त्यांच्या जवळ एक सुसाइड नोट जप्त करण्यात आली आहे. मात्र, सुसाइड नोटमध्ये काय उघड झाले आहे, ते मात्र समोर आले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान व जेडीएस नेते एच.डी.देव गौडा यांनी याबद्दल दु: ख व्यक्त केले आणि ते म्हणाले की, राज्य विधानपरिषदेचे अध्यक्ष जेडी नेते एस.एल. धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला धक्का बसला. धर्मगौडा हा शांत आणि साधा माणूस होता. त्यांच्या आत्महत्येमुळे राज्याचे नुकसान आहे.