बंगळुरू – कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना पुन्हा वेग आल्याने पुन्हा नेतृत्व बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच येडीयुरप्पा यांनी दिवसभरात दोन बैठका घेतल्या आहेत.
पक्षीय अधिकारातून मंत्री मंडळाच्या विस्ताराला हिरवा झेंडा मिळाला असून त्याकरीता येडियुरप्पा यांनी शुक्रवारी राज्य मंडळाची आणि पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावली होती. गेल्या आठवड्यात विविध महामंडळे (निगम-बोर्ड्स) यांच्यावर होणाऱ्या नियुक्त्यांसंदर्भात एकाच दिवसात दोनदा बैठका झाल्याने याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू होती. यापूर्वी एकदा मंत्रिमंडळातील खांदेपालट नंतरच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागला होता. तथापि, राज्यात पक्षाच्या होणाऱ्या विविध अडचणींचा सामना सुरूच आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वनाथनारायण यांनी पुन्हा एकदा सांगितले की, येडियुरप्पा यांचे पद कायम
राहिल. राज्याच्या नेतृत्वात बदल होणार नाही. मात्र चामराजनगर येथील खासदार श्रीनिवास प्रसाद यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिला. तर खासदारांच्या बैठकीनंतर कलबुर्गीचे खासदार उमेश जाधव म्हणाले की, ही बैठक कोणत्या विषयावर आहे, याबद्दल काही स्पष्ट नाही. राज्याशी संबंधित विषयांवर आम्ही लक्ष केंद्रित करू ईच्छितो. याचवेळी अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत. तर इकडे येडियुरप्पांवर अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागण्याची वेळ येत आहे.
गेल्या काही वर्षांत पक्षाचे कामकाज अडचणीच्या ठिकाणी चालू होते आणि आता नेते व कार्यकर्ते वातानुकूलित खोलीत बसतात, अशी टीका काहींनी केली आहे. यापुर्वी येडियुरप्पा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत येडियुरप्पा यांनी दिल्लीत गेल्या तीन महिन्यांत दोनदा मोर्चेबांधणी केली. पण, त्यात यश आलेले नाही.