बंगळुरू – कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. जारकीहोळी यांच्यावर कारवाई करावी आणि व्हिडिओतील तरुणीला संरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
जलसपंदामंत्री रमेश जारकीहोळी यांचे एका तरुणीसमवेत अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने राजधानीसह मंत्रिमंडळ आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नोकरीचे निमित्त साधून तरुणीशी जवळीक साधणे आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा आरोप जारकीहोळी यांच्यावर केला जात आहे. कलहळ्ळी यांनी पोलिस आयुक्तांची याप्रकरणी भेट घेतली असून जारकीहोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1366787811391676417