नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधान विराट कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकीय खेळी केली. विराटनं या सामन्यात ६० चेंडूत ६ चौकारांच्या सहाय्यानं ५६ धावा कुटल्या. या खेळीूनं त्यानं एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आणखी एक विक्रम केला आहे. विराटनं मायभूमीवर सर्वात कमी डावात १० हजार धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला विराटनं मागे टाकलं आहे.
मायभूमीवर सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारे ६ फलंदाज
विराट कोहली – १९५ डाव
रिकी पॉँटिंग – २१९ डाव
सचिन तेंडुलकर – २२३ डाव
महेला जयवर्धने – २२३ डाव
कुमार संगकारा – २२९ डाव
जॅक कॅलिस – २३६ डाव
विराटनं राहुल द्रविडला मागे टाकलं
विराट कोहलीनं इंग्लंडविरुद्ध आपल्या करिअरमध्ये २७ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या विक्रमात त्यानं राहुल द्रविडला मागे सारलं आहे. राहुल द्रविडनं २६ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्यामध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिननं ३२ वेळा ही कामगिरी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – ३२
विराट कोहली – २७
राहुल द्रविड – २६
एम. एस. धोनी – २४
भारतात विराटच्या १० हजार धावा पूर्ण
इंग्लंडविरुद्ध ५६ धावा केल्यानंतर भारतीय मैदानांवर क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून १० हजार धावा करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरनं हा कारनामा केलेला आहे. भारतीय धरतीवर क्रिकेटच्या सर्व प्रकारात सचिन तेंडुलकरनं १४,१९२ धावा केल्या आहेत. विराटनं आता १०,००२ धावा तर तिसर्या स्थानावर ९,००४ धावांसह राहुल द्रविड आहे. भारतीय कर्णधार असताना विराटनं मायभूमीत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २००० धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी महेंद्र सिंग धोनीनं ही कामगिरी केली होती.
एकदिवसीय सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर – १४५
कुमार संगकारा – ११८
रिकी पाँटिंग – ११२
विराट कोहली – १०४
जॅक कॅलिस – १०३