नाट्यकलावंतासह अन्य तिघे पोलिसांच्या ताब्यात ; देशी बनावटीचे पिस्टल वापरल्याची दिली कबुली.
नाशिक – कर्जाचा बोजा वाढल्याने कार चालकानेच गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा बनाव केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासात तपास करून खोटी फीर्याद देणाऱ्या नाट्यकलावंतासह अन्य तिघे जनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून देशी बनावटीचे पिस्टल वापरल्याची त्यांनी कबुली दिली. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नाशिक शहरातील कॉलेजरोड येथील रहिवासी स्वप्निल नंदकिशोर दंडगव्हाळ हे काही कामानिमित्त ठाणे येथे आपल्या मित्राची हयुंदाई अक्सेंट कार क्र. एम. एच. १५. ई. पी. १४३४ हे वाहन घेऊन गेले होते. त्यानंतर कामकाज करून ते पुन्हा रात्री नाशिककडे परतत असतांना, मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीव-हे शिवारातील हॉटेल करिश्मा येथे ते जेवणासाठी थांबले. जेवण करून ते पुन्हा वाहनाने रायगडनगर जवळील वळवणावर यु-टर्न घेण्यासाठी जात असतांना नाशिक बाजुकडून काळ्या रंगाचे मोटर सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी स्वप्निल दंडगव्हाळ यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलमधुन गाडीच्या समोरील काचेवर गोळीबार करून मुंबईच्या दिशेने पळुन गेले बाबत दिलेल्या तक्रारीवरून वाडीव-हे पोलीस ठाणेत गुन्हा रजि. नंबर ५१/२०२१ भादवि कलम ३०७,३४ सह आर्म अक्ट ३/२५ प्रमाणे दि.२६/०२/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सदर घटनेचा आढावा घेऊन गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, स्थागुशा नाशिक ग्रामीण यांचे पथकाने वरील गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. सदर गुन्हयातील फिर्यादी स्वप्निल दंडगव्हाळ यांनी घटनेच्या दिवशी करिश्मा ढाब्यावर जेवन केल्यानंतर मध्यरात्री उशिरापर्यंत सदर ठिकाणी थांबून नाशिककडे येण्यासाठी निघाले असतांना त्यांचेवर हल्ला झाल्याची हकिकत सांगितली होती. त्याप्रमाणे पोलीस पथकाने घडलेल्या प्रकाराबाबत कसोशिने पडताळणी केली असता, फिर्यादी यांचे सांगण्यात व प्रत्यक्ष घटनाक्रमात विसंगती आढळुन आली. त्यावरून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी स्वप्निल दंडगव्हाळ यांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, घटनेच्या दिवशी रात्रीचे ०१:३० वा. चे सुमारास फिर्यादी यांनी त्यांचे स्वत:चे कब्जातील विनापरवाना बेकायदेशी असलेले देशी बनावटीचे पिस्टल मधुन त्यांचेकडील हयुंदाई कार क्र. एम.एच.१५.ई.पी.१४३४ हिचे समोरील काचेवर गोळी झाडुन त्यांचेवर प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव केला असल्याची कबुली दिली आहे.
यातील फिर्यादी स्वप्निल नंदकिशोर दंडगव्हाळ हे कर्जबाजारी झालेले असल्यामुळे लोक त्यांचेकडे पैशांसाठी तगादा लावत होते. यातुन मार्ग काढण्यासाठी त्यांनी एकांत व अंधाराचा फायदा घेऊन त्यांचेकडील पिस्तुलमधुन त्यांचे ताब्यातील कारवर गोळी झाडुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाला असल्याचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील फिर्यादी स्वप्निल नंदकिशोर दंडगव्हाळ, वय ३४, रा. कुलस्वामिनी बंगला, कॉलेजरोड, नाशिक यांनी घटनेच्या दिवशी रात्री त्यांचे नाशिक येथील मित्र नामे १) केशव संजय पोतदार, वय २५, रा. सिध्दीविनायक सोसायटी, इंदिरानगर, नाशिक, व २) रौनक दिपक हिंगणे, वय ३१, रा. गुरुदारा रोड, शिंगाडा तलाव, नाशिक यांना घटना स्थळापासून थोडे दूर अंतरावर बोलावून घेऊन त्यांचेकडे गुन्हयात बेकायदेशीरित्या वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल दिले असल्याचे कबुल केले आहे. यातील फिर्यादीचा मित्र केशव पोतदार याने सदर पिस्टल हे साथीदार नामे ३) आसिफ आमिन कादरी, वय ३५, रा. मोठा राजवाडा, काळे चौक, नाशिक याचेकडे लपविण्यासाठी दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील फिर्यादी व त्याचे वरील तिन्ही साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयाचे पुढील तपासकामी त्यांना वाडीव-हे पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सपोनि समीर आहिरराव, सपोनि अनिल वाघ, सपोउनि नवनाथ गुरूळे, रविंद्र शिलावट, पोहवा बंडु ठाकरे, शिवाजी जुंदरे, रविंद्र वानखेडे, पो.ना.संदिप हांडगे, सचिन पिंगळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, योगेश गुमलाडु यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.