कर्क, सिंह किंवा कन्या रास असणाऱ्यांसाठी यशाच्या टीप्स
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यातले छोटे छोटे बदल आवश्यक असतात. त्यासाठी या टिप्स फॉलो करा.
कर्क रास असलेल्यांसाठी
-
पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा नक्षत्र असेल तर आपण आपल्या भावना मोकळ्या पद्धतीने व्यक्त केल्या पाहिजे.
-
सार्वजनिक जीवनामध्ये फक्त शांत राहून चालत नाही. योग्य वेळी आपण बोलले पाहिजे.
-
पटकन कोणाबद्दल ही गैरसमज करून घेऊ नये झाला असेल तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून तो दूर करून घ्यावा.
-
कोणत्या विषयातले आपले मत ठाम ठरवू नये. परिस्थिती बदलेल तसे आपले मतही बदलावे.
-
कोणताही वाद दीर्घकाळ घालू नये.
-
अतिविचार टाळावा
********
सिंह रास असलेल्यांसाठी
-
जर आपली सिंह रास मघा, पूर्वा, उत्तरा नक्षत्र असेल तर आपण सभोवतालच्या व्यक्तींच्या भाव भावनांचा आदर केला पाहिजे.
-
सौम्य शब्दात सहकाऱ्यांची चूक लक्षात आणून द्यावी.
-
भांडणास कारणीभूत होईल असा मुद्दा चारचौघात उपस्थित करू नये.
-
सल्लागाराच्या भूमिकेत राहावे. टीकाकाराच्या नाही.
-
योग्यवेळी श्रोता बनावे तर योग्य वेळी वक्ता बना.
*******
कन्या रास असलेल्यांसाठी
-
जर आपली कन्या रास उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र असेल तर आपण संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे.
-
प्रत्येक गोष्टींचे रॉकेट सायन्स फक्त आपल्याला माहित आहे असा आविर्भाव नको.
-
न विचारता कुणालाही सल्ला देऊ नये.
-
आपली मते भूमिका दृष्टिकोन इतरांवर लादू नये.
-
परिचितांना स्वतःहून फोन करून सुखदुःखाची विचारणा करावी.
-
आपल्या अति सल्ला देण्याच्या च्या स्वभावाने परिचितांनी आपल्याला महत्त्वाच्या निर्णयात आपल्याला टाळू नये याची काळजी घ्यावी
****
या टिप्स फॉलो करा आणि बघा आपण जीवनात कसे यशस्वी होतात