मुंबई/नाशिक- असोसिएशन ऑफ कन्स्ल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स (एसीसीई) संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नाशिकचे सिव्हिल इंजिनिअर विजय सानप यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या देशभरात २४ शाखा असून ६ हजाराहून अधिक सिव्हिल इंजिनिअर्स त्याचे सभासद आहेत. सानप यांच्या रुपाने पुन्हा एकदा नाशिकला हा बहुमान मिळाला आहे.
गेल्या ४ दशकांपासून ही संस्था सिव्हिल इंजिनिअर्सचे नेतृत्व करीत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील दोन जणांना या संस्थेचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यात नाशिकचेच सिव्हिल इंजिनिअर अविनाश शिरोडे यांचा समावेश आहे. शिरोडे हे १२ वर्षांपूर्वी या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर नागपूरच्या जैन यांना ही संधी मिळाली. आता पुन्हा हे राष्ट्रीय पद महाराष्ट्राकडे आले आहे.









