पुणे – सोसायटीचे सभासद तसेच फ्लॅट धारक यांना बिल्डर खरेदी खत करून देत नसतील तर काय करायचे याचे ममार्गदर्शन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पॅनलने उपलब्ध करुन दिले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय सागर यांनी सांगितले आहे की, बिल्डरने खरेदी खत (कन्व्हेयन्स डीड) करुन देणेची जबाबदारी पार पाडली नाही. आपण डीम कन्व्हेयन्स साठी खूप प्रयत्न केले असतील परंतु असंख्य कागदपत्रे गोळा करणे आणि सहकार खात्यातील एजंटगिरी, वकील वर्गाची फी तसेच सहकार खात्यातील आणि कॉर्पोरेशन मधील खाबुगिरी यामुळे फ्लॅटचे सगळे पैसे बिल्डरला देऊन सुद्धा आपण आपल्या घराचे/फ्लॅट चे मालक झालेले नाहीत. आपण आता काय करायचे सगळे सोडून द्यायचे की आपला हक्क मिळवायचा. आपले घर आपल्या नावावर करून घ्यायचे. आपण पोलिस स्टेशन मध्ये गेल्यानंतर बिल्डर विरुद्ध FIR दाखल करून घेण्यास पोलिसांकडून होणारी टाळाटाळ यामुळे आपण पूर्ण पणे खचून गेला असताल तर हा व्हिडिओ नक्की बघा.