दुबई – संयुक्त अरब अमिरातीमधील कायदे अत्यंत कडक आहेत. दुबई शहरातील एका बाल्कनीतील न्यूड फोटोशूटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे येथील सरकारने न्यूड फोटोशूट्समध्ये सामील असलेल्या महिला आणि पुरूषांच्या एका गटाला संयुक्त अरब अमिरातीमधून हद्दपार (निर्वासित) करण्याचा आदेश दिला आहे. यापुढे असा प्रकार करणाऱ्यांना निर्वासित केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर घटना संयुक्त अरब अमिरातीच्या मूल्यांच्या विरुद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुबईचे अॅटर्नी जनरल इस्सा अल हमायदान म्हणाले की, यात सहभागी असलेल्या व्यक्तींना संयुक्त अरब अमिरातीमधून हद्दपार केले जाईल. मात्र या फोटोशूटमध्ये सामील झालेल्या लोकांच्या राष्ट्रीयतेचा उल्लेख नाही.
दरम्यान, पोलिसांनी म्हटले आहे की, या समुहाचे वर्तन देशातील समाजास अस्वीकार्य असून मूल्यांच्या आणि नीतिमत्तेचे उल्लंघन आहे. दुबई हे संयुक्त अरब अमिरातीचे एक प्रादेशिक व्यवसाय आणि पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी परदेशी लोक समुद्र पर्यटनाचा आनंद घेतात आणि इथल्या लक्झरी जीवनशैलीचा आनंद घेतात.
दुबईतील संयुक्त अरब अमिराती (युएई) शहरात काही स्त्रिया बाल्कनीमध्ये पूर्णपणे नग्न उभे राहून स्टंट करीत होत्या. या सर्व प्रकाराचा एकाने व्हिडिओ बनविला. तो पोलिसांना मिळाला. त्यानंतर पोलिसांनी १२ महिलांना अटक केली. दुबईमध्ये शरियत कायदा अस्तित्त्वात असल्याने त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे हा दंडनीय गुन्हा आहे.