नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी जैश- ए – मोहम्मदच्या दोन दहशवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा कट होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रात्री उशीरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दहशतवादी जम्मु काश्मिरच्या बारामुला व कुपवाडा येथे राहणारे होते. या दहशतवाद्याकडून पोलिसांनी हत्यार, कागदपत्र व स्फोटक मिळाली आहे. पोलिसांना या दोन दहशतवाद्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ट्रॅप लावला. त्यानंतर या दहशतवाद्यांना मिलिनियम पार्कजवळ अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांचा दिल्ली – एनसीआरमधील काही ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट होता.