नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा जन्मदात्या चीनविरुद्ध तसाही जगभरात असंतोष आहेच. त्यात भारत आणि अमेरिका तर आघाडीवर आहेत. पण आता कंबोडियासारखा आकाराने लहान असलेला देशही चीनविरुद्ध मैदानात उतरला आहे आणि त्यालाही कोरोनाच कारणीभूत आहे.
कोरोना विषाणूच्या लसचा प्रयोग करण्यासाठी चीनने कंबोडियाची निवड केली असून ते कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना मुळीच आवडलेले नाही. त्यांनी चीनवर थेट हल्ला चढवत ‘आमचा देश डंपिंग ग्राऊंड नाही’ या शब्दांत बजावले आहे. लसीच्या चाचणीसाठी कंबोडिया योग्य जागा नाही, त्यामुळे आम्ही चीनला कुठलीही संधी देणार नाही. आम्ही केवळ आरोग्य संस्थांनी प्रमाणित केलेल्या लसच कंबोडिया विश्वास ठेवेल व तेच स्वीकारेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हून सेन यांच्या हा पवित्रा चीनसाठी मोठा धक्का आहे. कारण सामाजिकदृष्ट्या चीन आणि कंबोडिया यांच्यातील जवळीक जास्त आहे. पण, या निमित्ताने दक्षीण पूर्व सागरात चीनच्या आक्रमक पवित्र्याविरोधात कंबोडियाने राग आवळण्याची संधी घेतलेली आहे, अशीही चर्चा जागतिक स्तरावर सुरू आहे. त्यामुळे अचानक कंबोडियाची भूमिका का बदलली असा प्रश्न उपस्थित होणे अत्यंत स्वाभाविक आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जगात कोरोनाच्या संक्रमणासाठी चीनच कारणीभूत आहे, याबद्दलचा कमालीचा राग जगभरात आहे. अशात चीन कधी काय करेल, याचा नेम नाही. त्यामुळे व्हॅक्सीनचा प्रयोग पहिले आपल्या देशातील नागरिकांवर करा आणि नंतर आमच्याकडे या, असाच इशारा कंबोडियाला द्यायचा असेल तर त्याचे आश्चर्य वाटण्याचेही कारण नाही.
एकत्र आणण्यात अपयश
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी आगस्टमध्येच कोरोना व्हॅक्सीनच्या संदर्भात दक्षिण पूर्व आशियाई देशांना आम्ही प्राथमिकता देऊ असे म्हटले होते. या माध्यमातून दक्षिण पूर्व आशियाई देशांना एकत्र आणण्याचा चीनचा प्रयत्न होता. मात्र कंबोडियाच्या पंतप्रधानांची भूमिका चीनचा प्रयत्न अपयशी ठरविणारी आहे. कंबोडियाच्या पवित्र्यानंतर चीनने व्हॅक्सीनचा पहिला स्लॉट इंडोनेशियाला रवाना केला आहे. अर्थात आतापर्यंत इंडोनेशियाकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.