नवी दिल्ली – आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. विशेषत : अंगदुखी, कंबरदुखी , पाठदुखी या सारख्या समस्यावर वेदनाशामक (पेनकिलर) गोळ्या, औषधी घेण्या ऐवजी योगासने करणे हा चांगला उपाय आहे.
कंबरदुखी, पाठदुखी या सारख्या समस्याचा त्रास प्रत्येकाला होतो. याला कारण म्हणजे शरीरात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता असणे होय. मासिक पाळीतील त्रास आणि गर्भाशयात सूज यामुळे स्त्रियांमध्ये पाठीचा त्रास जाणवतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, देशात ८० टक्के लोकांना आयुष्यात एकदाच तरी पाटदुखीच्या वेदना जाणवतेच. आपणास पाठीच्या दुखण्यानेही त्रास झाला असेल आणि त्यापासून मुक्त व्हायचे असेल तर आपण योगाची मदत घेऊ शकता. योगाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे नौकासन होय. योग तज्ज्ञांच्या मते, नौकासन केल्याने कंबरदुखी, पाठदुखी बरी होते.
आता या योगासनाबद्दल जाणून घेऊ या…
नौकासन म्हणजे काय
नौकासन याचा अर्थ , नौका म्हणजे नाव आणि आसन म्हणजेच मुद्रा हे दोन शब्दांनी बनलेले आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, नौकासनामध्ये बोटीच्या आसनासारखे बसून योग केला जातो. सुरुवातीला हा योग करण्यात अडचण येऊ शकते. सतत अभ्यास करून नौकासन सहज करता येते. मात्र काही अडचण असल्यास असे करण्यापूर्वी योग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
नौकासन कसे करावे
या योगासनासाठी, सपाट आणि स्वच्छ जमिन किंवा मैदानावर कार्पेट किंवा चटई टाकावी. यानंतर, आपल्या पाठीवर आडवे होऊन हळूहळू पाट आणि आपले दोन्ही पाय वर उचला. आपले हात वर ठेवा, थोडक्यात शरीराला नौकेसारखा ( होडी सारखा ) आकार दया. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि यानंतर, आपल्या पहिल्या पोझीशनमध्ये परत या. दररोज किमान १० वेळा हा योग करा.
पाठदुखीमध्ये रामबाण उपाय
काही तज्ज्ञांच्या मते, नौकासन हा पाठदुखीचा रामबाण उपाय आहे. असे केल्याने तुम्हाला लवकरच पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. जर तुम्हाला पाठदुखीच्या समस्येने त्रास होत असेल तर दररोज नौकासन करा. असे केल्याने पाठदुखीची समस्या दूर होते. तसेच, नौकासन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते.