मुंबई ः येत्या डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये होणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. प्रचार समिती प्रभारी हे रूबेन मस्करेन्हास हे राहणार आहेत.
राज्य समितीच्या बैठकीत ठरविण्यात आल्या प्रमाणे आम आदमी पार्टी येणाऱ्या काळात बूथ पातळीपर्यंत संघटना बांधताना ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक संस्था, महानगरपालिका यांच्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहे. त्यानुसारच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे.
पक्षाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकी संदर्भात सर्व निर्णय घेण्याचे व जबाबदारी वितरित करण्याचे आधिकार कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक प्रचार समितीकडे असतील. ही प्रचार समिती ठाणे जिल्हा व ठाणे पालघर विभागीय समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. समितीमार्फत उमेदवारांची निवड, ठरवलेले निकष व प्रक्रियेनुसार केली जाईल. उमेदवारांविषयी निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक प्रचार समिती एकत्रितपणे घेईल आणि ते प्रभारी रूबेन मास्करेन्हास यांच्या मार्फत राज्य समितीकडे मंजुरीसाठी पाठविले जातील. समितीतील सर्व सदस्य आणि सक्रिय कार्यकर्ते समितीने ठरविल्याप्रमाणे निधी उभारणे, महिला विंग, युथ विंग, डॉक्टर विंग इत्यादी विशिष्ट आघाड्यांमध्ये काम करतील. तसेच बूथ निहाय टीम आणि प्रभाग टीम याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही निश्चित करण्यात आले आहे. तशी माहिती आपचे संयोजक, रंगा राचुरे, सहसंयोजक किशोर मंध्यान, सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
कंडोमपा समिती अशी
प्रचार समिती प्रभारी – रूबेन मस्करेन्हास
१. संयोजक – धनंजय जोगदंड.
२. सहसंयोजक – लक्ष्मीकांत केरकर
३. सहसंयोजक / मीडिया सल्लागार – किरण मेस्त्री
४. सहसंयोजक-मिथीलेश झा
५. सचिव – आकाश वेदक
६. सहसचिव- प्रवीण कुरले, रवी केदारे, हमजा हुसेन, संदिप नाईक
७. कोषाध्यक्ष – आशीष मिश्रा
८. सह कोषाध्यक्ष – सिद्धार्थ गायकवाड
९. सह सचिव (सोशल मीडिया) – तेजस नाईक, धनंजय उपाध्याय, सिद्धांत गायकवाड.