मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सादर केला आहे. सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यामुळेच सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या पाकिस्तानचे जगातच क्रेडिट नाही त्या देशाचे क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु, असा सवाल सरनाईक यांनी प्रस्ताव सादर करतेवेळी विचारला आहे. कंगनाने अशा प्रकारे बदनामी करणे चुकीचे आहे, असेही सरनाईक यांनी म्हटले आहे.