नवी दिल्ली – चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण मुंबईतील स्थानिक न्यायालयात कॉपीराइट उल्लंघनासाठी कंगना यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशिष कौल यांनी हा खटला दाखल केला होता. कौल हे ‘क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाचे हक्कदार आहेत.
आशिष कौल यांनी कॉपी राईट उल्लंघन केल्याचा आरोप कंगनावर केला होता. तसेच त्यांनी न्यायालयात धाव घेतली. आशिष कौल यांनी दावा केला की, ‘काश्मीरची वॉरियर क्वीन’ या कथेचा हक्क आपल्याकडे आहे. खार पोलिस स्टेशन कंगनाविरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहे. कंगनाच्या विरोधात अगोदरही बरीच प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत. अनेकदा आपल्या वक्तव्यांबाबत कंगणा चर्चेत आणि वादात असते.
कांगना अनेकदा बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शकांविरोधात एकत्र येत असते. त्यामुळे ती अजूनही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी पडत आहे. कंगनाला तिचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या अनेक धमक्याही मिळाल्या आहेत.
कंगना ही एक धाडसी चित्रपट अभिनेत्री असून अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली आहे. लवकरच ती तेजस, धाकड आणि थलवी या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला तेजस या चित्रपटात ती भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे.