मुंबई – अभिनेत्री कंगना रणावत यांच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने केलेली अतिक्रमण कारवाई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे. ते पूर्ववत करुन देण्याचे आदेशही न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहे. ही कारवाई वाईट हेतून सुडबुध्दीने केली. वैयक्तीक व्देषापोटी कायद्याचे पालन न केली असे निरीक्षणंही न्यायालयाने नोंदवले आहे. या नुकसान भरपाईसाठी व्हॅल्युअरने तीन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर योग्य तो आदेश दिला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.