नाशिक – अभिनेत्री कंगना राणावत ही काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर आरोप करीत आहे. तसेच, मुंबईची तुलना तिने पाकव्याप्त काश्मिरशी केली आहे. त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. नाशिक शहरातही शिवसेनेच्यावतीने कंगना राणावत हिच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तसेच, शालिमार येथील सेना भवनाच्या बाहेर कंगनाचा पुतळाही जाळण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.