मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिने शेतकऱ्यांविषयी केलेले वादग्रस्त ट्विट अखेर ट्विटरने डिलीट केले आहे. या ट्विटमध्ये कंगनाने शेतकऱ्यांना थेट अतिरेकी म्हटले होते. राजधानी दिल्लीच्या सीमांवरुन सुरू असलेल्या आंदोलनावरुन कंगनाने हे ट्विट केले होते.
शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहानाने या आंदोलनाला पाठिंब्याचे ट्विट केले होते. त्याचवेळी कंगनाने रिहानाला ट्विटरवर उत्तर दिले होते. आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही, अशी थेट टीका कंगनाने केली होती. तसेच, शेतकरी आंदोलकांना कंगनाने अतिरेकी म्हटले होते. भारताच्या विभाजनाचा हा प्रयत्न असल्याचेही तिने म्हटले होते. या ट्विटवर ट्विटरने आक्षेप घेतला आणि हे ट्विट डिलीट केले आहे.
आमच्या धोरणांचे उल्लंघन झाल्यामुळेच आम्ही ही कारवाई केल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1356640083546406913