नाशिक : २६ जानेवारी पर्यंत औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करा असा इशारा सरकारला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य परिवहन मंडळाच्या बसांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिटकवून अभिनव आंदोलन केले.
या आंदोलनाबाबत मनसेच्या पदाधिका-यांनी सांगितले की हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभेत बोलतांना शहराचे नाव औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती. जुन १९९५ मध्ये औरंगाबाद महापालिकेत छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मंजूर झालेल्या ठरावाला राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली. कॉंग्रेसच्या तत्कालीन नगरसेवकाने या विरुद्ध आधी हायकोर्टात व नंतर सुप्रीम कोर्टात याचिका टाकली. एकेकाळी छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेने आता कॉंग्रेस बरोबर घरोबा मांडला असून या नामकरणाबाबत गुळमीळीत भुमिका घेतली आहे.
या आंदोलनात शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, संतोष कोरडे, संजय देवरे, अमित गांगुर्डे, निखील सरपोतदार, किशोर वडजे, नितीन माळी, अर्जुन वेताळ, चंद्रभान ताजनपुरे, गोकुळ नागरे, साहेबराव खर्जुल, सुनील पाटोळे, शाम गोहाड, संदेश जगताप, सिद्धेश सानप, अक्षय कोंबडे, दत्तात्रय इंगळे यांनी सहभाग घेतला.