औरंगाबाद – औरंगाबाद येथे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची व्यापक बैठक झाली यामधे विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी २२ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या पळी – ताम्हण वाजवून होत असलेल्या आंदोलना संदर्भात माहिती देऊन आंदोलन का केले पाहिजे हे सांगितले यावेळी संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दिपक रणनवरे , विजयाताई कुलकर्णी , विजयाताई अवस्थी उपस्थित होते . २२ जानेवारी २०२१ रोजी होत असलेल्या आंदोलनाच्या पुर्व तयारी साठी औरंगाबाद येथे बैठक घेण्यात आली यावेळी सर्व प्रथम भगवान परशुराम वंदन करून कोरोना योध्दा व कोरोनाने मृत झालेल्या सर्वाना अभिवादन करून बैठकीस सुरूवात झाली .
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची बैठक औरंगाबाद शहरात कलश मंगल कार्यालयात घेण्यात आली २२ जानेवारी रोजी होणाऱ्या ताम्हण पळी वाजवा आंदोलना संदर्भात माहिती देण्यासाठी शहरातील सर्व संघटनांच्या जबाबदार व्यक्तींना एकत्रित आंदोलन कशासाठी, मागण्या, आपले उद्देश आपले उद्दिष्ट आणि संघर्ष का? याची जाणीव झाली पाहिजे. व आपल्या मागण्या आपल्याला मागुन घेताच आल्या पाहिजेत. ही मशाल पेटती ठेवूनच ब्राह्मण एकता दिन साजरा करू अशी जाणीव करून देण्यात आली याप्रसंगी जालना येथून दिपक रणनवरे उपस्थित होते. सुरेश देशपांडे ., प्रमोद झालटे , गोपाळ कुलकर्णी, सतीश खनाळे, संगीता शर्मा, जीवन गुरु भोगावकर, राजेंद्र शर्मा, मुकेश शर्मा , मंगेश पळसकर , अभिषेक कादी, सचिन अवस्थी विजय मिश्रा , मिलिंद दामोदरे ,सोनाली अवस्थी , लता त्रिवेदी, वैभवी अवस्थी,आलोक दुबे, नविन अवस्थी, रविंद्र पिसोळकर,प्रकाश वझरकर, अरून टेकाळे, अशोक तिवारी, हेमंत त्रिवेदी,पंकज पाठक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दिपक रणनवरे यांनी सांगितले की समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या माध्यमातून होत असलेले आंदोलन हे कोणाही विरोधात नसुन सरकारकडून समाजाच्या न्याय व हक्काच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आहे . कोणताही राजकीय पक्ष , नेता अथवा कोणत्याही समुहा विरोधात आंदोलन नसून ब्राह्मण द्वेषाने पछाडलेल्या कुप्रवृत्ती विरोधात आहे. आपल्या स्वतःच्या समाजासाठी ब्राह्मण समाजाने रस्त्यावर उतरून संघर्ष केला तरच सरकारच लक्ष वेधल जात यासाठी आंदोलन करावे लागते . ब्राह्मण समाजातील गोरगरीबासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी आंदोलन करावेच लागणार आहे व यासाठी २२ जानेवारी ला जास्तीत जास्त संख्येने ब्राह्मण समाजाने आपली उपस्थिती लावावी असे आवाहन समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले .
याप्रसंगी सौ.विजया कुलकर्णी यांनी सुत्र संचलन केले. तर सौ. विजया अवस्थी यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व समाजातील बंधु भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन केले.