मुंबई – औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ते येथे आज पत्रकारांशी बोलत होते.
मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. ते किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे जात असून गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे.
महाविकास आघाडी टिकावी आणि विकासाला महत्व द्यावं, ही आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असून आम्हीदेखील याच भूमिकेचं समर्थन करुन पुढे जात आहोत, असं अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. आज दुपारी साडे तीन वाजता सह्याद्री अतिथी गृहात ही बैठक होणार असून आरक्षणाबाबतच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.