औरंगाबाद – येथील महानगरपालिका हद्दीतीत सर्व शाळा ३ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. शिक्षकांना मात्र शाळेत येणे अनिवार्य करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी ३ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये औरंगाबाद येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून संस्थाचालक तसेच स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत औरंगाबादचे मनपा आयुक्त यांनी नुकताच हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच ३० तारखेला पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येणार असून त्यात पुढील निर्णय देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.