मुंबई – औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राज्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. याप्रकरणी काँग्रेसने उघडपणे नाराजी जाहिर केली असताना उद्धव यांनी मात्र ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) ट्विटरद्वारे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा जाणिवपूर्वक करण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री हे म्हणाले
जे वर्षानुवर्षे बोलत आलो तेच मी केले
औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्ष नव्हता
आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नाही
काँग्रेसची प्रतिक्रीया
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने नामांतराला कायमच विरोध केला आहे. संभाजी महाराज आमचेही आराध्य दैवत आहेत. आमची जी भूमिका आहे ती आम्ही मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू. किमान समान कार्यक्रमावर आम्ही एकत्रित काम करीत आहोत. आम्ही एकत्र बसू असेही थोरात म्हणाले.