नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात २०२२ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. वेगवेगळ्या युतीची राजकीय समीकरणे आधीच शिजवू लागली आहेत. शनिवारी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल यादव यांची लग्नसमारंभात भेट झाली तेव्हा निवडणुकांतील युती विषयी अर्धा-तास चर्चा झाली.
पुरोगामी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव यांनी काढलेल्या संकल्प मोर्चा मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. फूलपूर तालुक्यातील माहुल येथे विवाह सोहळ्यासाठी शिवपाल यादव आणि ओवैसी हे दोघे दाखल झाले. या विवाह सोहळ्यास अचानक आलेल्या शिवपाल यादव यांनी औवैसीशी अर्धा तास गप्पांनंतर घोषणा केली की, उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ येत असून राज्यामधील धर्मनिरपेक्ष पक्षांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आहेत. तथापि, राजकीय उलथापालत सुरू असताना युतीबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही, परंतु दोघे पक्ष एकत्र निवडणुक लढवू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.