हैदराबाद – हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडात भाजपने जोरदार कामगिरी केल्याचे स्पष्ट होत आहे. याथील मतमोजणी सध्या सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार ४० जागांवर आघाडीवर आहेत. तर, सत्ताधारी टीआरएसचे १० उमेदवार आघाडी घेऊन आहेत. गेल्या निवडणुकीत येथे भाजपने ५ जागा जिंकल्या आहेत. भाजपने येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींच्या सभा व रॅली येथे झाल्या. ओवेसी यांना धडा शिकविण्यासाठी भाजपने मोठी रणनिती येथे आखली होती. ती यशस्वी होताना दिसत आहे. दुपारपर्यंत येथील निकाल स्पष्ट होतील.