नाशिक – ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टातील याचिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिल्ली मध्ये ज्येष्ठ विधीज्ञ डॉ.कपिल सिब्बल यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते.