वाशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आपल्या ग्रंथात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा वेगळाच उल्लेख केला आहे. याबाबत आता अमेरिका आणि भारतात चर्चा सुरू झाली आहे.
आपल्या या ग्रंथात बराक ओबामा नमुद करतात की, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात निराश विद्यार्थ्याचे गुण आहेत, ज्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे, परंतु नेमका विषय आणि त्याचा उत्कट भावनेमध्ये प्रभुत्व मिळविण्याची क्षमता यांची उणीव दिसत आहे. न्यूयॉर्क टाईम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ च्या सस्मरण ग्रंथाची समीक्षा केली आहे. यामध्ये माजी राष्ट्रपती ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार ओबामा हे राहुल गांधींबद्दल म्हणतात की, ‘संपूर्णपणे अभ्यासक्रम पूर्ण केलेला आणि आता आपल्या शिक्षकाला प्रभावित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण त्यामध्ये आहेत. परंतु यामध्ये काही विषयावर प्रभुत्व मिळविण्याची क्षमता कमी आहे. याच आठवणींमध्ये ओबामांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेखही केला.
या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दोघांचेही साम्य म्हणजे अगदी निर्दोष प्रामाणिकपणा होय. पुढे त्यात असेही म्हटले आहे की, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जणू ओबामांना शिकागोमध्ये मशीन चालवणाऱ्या बलाढ्य व हुशार अधिकाऱ्याची आठवण करुन दिली. ओबामा यांचे हे 768 पानांचे पुस्तक 17 नोव्हेंबरला बाजारात दाखल होणार आहे. ओबामा हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहे की , त्यांनी आपल्या कार्यकाळात दोनदा भारत भेट दिली.