वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ए प्रॉमिस लँड’ या नव्या पुस्तकात अनेक महत्त्वपूर्ण खुलासे करण्यात आहेत. त्यामुळे आता ओबामा यांचे हे पुस्तक जगभर चर्चेचा विषय राहिले आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनविषयी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी ‘ए प्रॉमिस लँड’ या पुस्तकात लिहिले आहे की, पाकिस्तानच्या बोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणावर हल्ला करण्याच्या आपल्या योजनेस जो बामडेन यांनी विरोध दर्शविला होता.
पाकिस्तानी सैन्याला सामील करण्यास नकार दिला गेला होता, कारण तेव्हा असा विश्वास वाटत होता की, पाकिस्तान लष्कराला हे ठाऊक होते की, पाकच्या गुप्तचर यंत्रणांचे तालिबानशी संबंध होते. त्याचबरोबर ओबामा यांनी असेही लिहिले आहे की, पाकिस्तान, अल कायदासह अफगाणिस्तान आणि भारतविरूद्ध दहशतवादी गतिरोध सुरूच आहे.
या पुस्तकात, आणखी एक धक्कादायक खुलासा करताना त्यांनी लिहिले आहे की, दि. 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानच्या एबटाबाद येथे गुप्त कारवाई केली होती, तेव्हा संरक्षण सचिव रॉबर्ट गेट्स आणि जो बायडेन हे उपाध्यक्ष होते. तसेच अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बराक ओबामा यांनी मंगळवारी आपल्या पुस्तकात लादेन या दहशतवाद्याच्या हत्याविषयी अनेक रहस्ये वर्णन केली आहेत. यावरून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या बोटाबाद येथे सुरक्षित ठिकाणी लपला होता.
दरम्यान, या घटनेसंदर्भात ओबामा यांनी पुस्तकात लिहिले की, मी जे ऐकले त्या आधारे ठरवले होते की त्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी अमेरिकेकडे पुरेशी माहिती आहे. मात्र सदर काम करत असताना व हे आव्हान पेलण्यासाठी गुप्ततेची नितांत आवश्यकता होती, जर आपल्या योजनेचा थोडासा भागही लादेनला माहित झाला असता तर आपण त्याला जिवे मारण्याची संधी गमावली असती. त्यामुळे त्या काळात आमच्या सरकारमधील मोजकेच लोकांना या गुप्त कारवायांची माहिती होती. या गुप्त कारवाईत सर्वात मोठा अडथळा म्हणजे पाकिस्तानला त्याच्या विशेष रणनीतीत समाविष्ट केले गेले नाही.