ओझर – गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर झाल्याची माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत दिली. यावेळी बैठकिस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. एम. शिंदे भास्करराव शिंदे ओझर ग्रामपालिकेचे सदस्य प्रकाश महाले, हेमंत जाधव, संजय पगार, धर्मेंद्र जाधव, घनश्याम जाधव, सिध्दीविनायक समुहाचे अध्यक्ष प्रभाकरपंत आढाव, रामनाथ वाबळे, ओमको संचालक नवनाथ मंडलिक, विकास भट्टड, रवींद्र भट्टड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अनिल कदम यांनी आपल्या राजकीय वाटचालीत ओझरकरांचे मोठे प्रेम लाभल्याचे सांगत आपल्या जन्मभमीला विकासाच्या वेगळ्या ऊंचीवर नेण्याचे आपले स्वप्न असून, ग्रामविकासाला निधीच्या मर्यादा असल्याने ओझर ग्रामपालिकेचे नगरपरिषद रूपांतर केल्याचे सांगितले ओझर नगरपरिषदेची एक प्राथमिक उदघोषणा झाली असून, शासकीयस्तरावर अधिकृत घोषणा सोमवारी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अनिल कदम यांनी नगर परिषद झाल्या नंतर कोणतीही करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करत भविष्यात रस्ते पाणी वीज याच्यासह दर्जेदार विकास कामे साकारणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, दिलीप लद्धा, संजय पगार, प्रदीप अहिरे, धर्मेंद्र जाधव, नितीन काळे, विकास भट्टड, आशिष शिंदे, प्रशांत पगार, खलील कुरेशी, उस्मान पठाण, आयुब अत्तार, हेमंत जाधव, माधव कदम, घनश्याम जाधव, मधुकर नवघिरे, के.एम शिंदे, रामनाथ वाबळे, भावका शिंदे, यशवंत गवळी, कैलास कर्पे, प्रशांत अक्कर, प्रशांत शिंदे, प्रकाश कडाळे, विजय कुलकर्णी, आयुब पानवाले, दीपक जाधव, कामेश शिंदे, जयप्रकाश भट्टड, विजय भडके, मुकुंद जाजू आदी उपस्थित होते.
विकासकामे करू
ओझर विकासासाठी नगर परिषद काळाची गरज आहे. यात कुठलेही राजकारण नसून गेली अनेक वर्षे ओझर शहराचा विकास खुंटला आहे. नगरपरिषद झाल्यानंतर समर्पक विकास होईल. शहरात दर्जेदार विकास कामे साकारण्यात येतील, असे माजी आमदार अनिल कदम यांनी सांगितले.