पणजी – ऑस्ट्रेलियाच्या नौदलाची ‘एच एम ए एस बल्लारत’ ही युद्धनौका काल 10 नोव्हेंबर 20 रोजी गोव्याच्या मोरमुगाव बंदरात दाखल झाली. गोवा नौदल क्षेत्र मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांच्या संरक्षण सल्लागारांनी या जहाजाचे स्वागत केले.
बंगालच्या उपसागरात ‘मलबार’ चार देशांच्या युद्ध सराव मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर ‘एच एम ए एस बल्लारत’, या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात अरबी समुद्रातल्या दुसऱ्या सरावात सहभागी होत आहे. गोव्याहून ही युद्धनौका दि. 13 नोव्हेंबर 20 रोजी निघणार असून, विमानवाहू नौकेबरोबर पहिल्यांदाच करण्याच्या सरावाबद्दल या जहाजावरील खलाशी व नौसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.