नवी दिल्ली – सायबर क्राईममध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक सायबर क्राईम घडल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक झाली असल्याची त्याची आता थेट तक्रार करता येणार आहे. गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सायबर क्राईममध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता ग्रह मंत्रालयद्वारे खास पोर्टल सुरु करण्यात आले आहे. याद्वारे ऑनलाईन फसवणुकीची तक्रार नोंदवता येणार आहे. सर्वप्रथम पोर्टलवर गेल्यावर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच फसवणुकीची तक्रार करण्यासाठी आवश्यक अटींच्या पूर्ततेची यादी पोर्टलवर देण्यात आली आहे. त्याची पुष्टी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर फाईल कम्प्लेंट हा पर्याय निवडून झालेल्या फसवणुकीचा संपूर्ण तपशील तेथे भरावा. महिला तसेच बालकांच्या सायबर क्राईमसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, इतर सर्व सायबर क्राईमसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित अधिक माहितीसाठी https://www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.