नवी दिल्ली – दसरा, नवरात्रोत्सव आणि दिवाळीचा सण लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाईन शॉपिंग सेल आणला आहे. फ्लिपकार्टचा सेल सुरु झाला आहे तर अॅमेझॉनचा सेल उद्यापासून सुरू होत आहे.
अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून, प्राईम मेंबरसाठी १६ तारखेपासून सुरवात होत आहे. तर फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आज (१५ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपासून सुरु झाला आहे. बंपर सेलच्या नावाखाली मोठं मोठे डिस्काउंट देण्याचे कंपनी जाहीर करते मात्रयाकडे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मोठ्या तसेच बंपर ऑफरच्या मागे न धावता आपल्याला आवश्यक तेवढे खरेदी करावे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर नो कोस्ट ईएमआय मिळणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, ग्राहकांनी आकर्षित व्हावे यासाठी अनोखा मार्केटिंग फंडा राबवला जातो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ऑनलाईन खरेदीवर कॅशबॅक देखील मिळत असतो. कॅशबॅकच्या नावे ग्राहकांना आकर्षित केले जाते. ठराविक रकमेच्या खरेदीवर विशिष्ट कॅशबॅक दिला जातो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोणतीही वस्तू ऑनलाईन खरेदी करतांना त्याचे रिव्ह्यू पाहावे त्यानुसार वस्तू खरेदी करावी. मध्यंतरी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कंपनीद्वारे फसवणूक झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता खात्री करून वस्तू खरेदी करावी असे तज्ज्ञांनी सूचविले आहे.