नवी दिल्ली – अलीकडे कोणतेही आर्थिक व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात. पैसे देखील अनेकदा ऑनलाइन दिले जातात. पण हे व्यवहार करताना बँकेचा IFSC कोड जर चुकला तर काय होईल हे तुम्हाला ठाऊक आहे का?
खरं तर हे प्रश्न अनेकांना सतावत असतात. अकाउंट नंबर किंवा IFSC कोड जर चुकीचा टाकला गेला तर आपले पैसे दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये जातील का, अशी एक भीतीही असते. त्यामुळे असे ऑनलाइन व्यवहार करताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या बँकेच्या मुंबईतील शाखेत तुमचे खाते आहे. पण पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही मुंबईच्या ऐवजी पुण्याचा IFSC कोड टाकलात तरीही व्यवहार होईल. कारण तुम्ही टाकलेला अकाउंट नंबर जर बरोबर असेल तर पैसे दुसऱ्याच्या खात्यात जाऊ शकतात. कारण अशा व्यवहारात प्रामुख्याने अकाऊंट नंबर पाहिला जातो. अर्थात, तुम्ही ज्या शाखेचा किंवा बँकेचा IFSC कोड टाकला आहे, त्या बँकेत एखाद्या ग्राहकाचा तो अकाऊंट नंबर असेल तरच दुसऱ्याच्या खात्यात पैसे जाऊ शकतात. पण ही शक्यता फार कमी असते. कारण कोड आणि अकाऊंट नंबर जुळला तर पैसे ट्रान्सफर होत नाहीत आणि हा व्यवहार रद्द होतो.