कल्याण – कवी कट्टा ग्रुपच्या वतीने कवी नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली गूगल मिट द्वारे ऑनलाइन धम्म परिवर्तन कविसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी आशा रणखांबे यांनी गाणे सादर करीत कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. विविध विषयावर अॅड. प्रज्ञेश सोनावणे, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, भटू जगदेव, नवनाथ रणखांबे, अशोक कांबळे, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, रविकिरण म्हस्के, राष्ट्रपाल काकडे, सुरेखा गायकवाड, अनिल शिंदे, शाम बैसाने, कांतीलाल भडांगे, अशोक डोळस, विनोद गायकवाड यांनी स्वरचित मार्मिक कविता सादर करून प्रबोधन केले.
 
			








