नाशिक – कोरोनाशी दोन हात करतांना सुरक्षेच्या दृष्टीने ऑक्सिमीटरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवण्यासाठी ऑक्सिमीटरच्या मदतीने कोरोनाचा प्राथमिक स्तर जाणून घेणे शक्य झाले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने खबरदारी उपाय म्हणून हॉस्पिटल, छोटे दवाखाने तसेच घरगुती वापरासाठी ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ होत आहे. वाढत्या मागणीमुळे ऑक्सिमीटरचे दरही वाढले आहेत.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाली आहे. शरीरातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोरोनाचा प्राथमिक स्तर कळतो. शरीरात सामान्य स्थितीत ऑक्सिजन सॅचुरेशन ९५ ते १०० इतके असावे असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. घरीच व्हायरसचा स्तर तपासणे शक्य झाल्याने ऑक्सिमीटरला पसंती मिळते आहे. विक्रेते आणि ग्राहक भारतीय बनावटीच्या ऑक्सिमीटरला प्राध्यान्य देत आहेत. चांगल्या दर्जाचे व टिकाऊ ऑक्सिमीटरची विक्री १००० रुपयांपासून पुढे होत आहे. मधल्या काळात बनावट ऑक्सिमीटरची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. वाढीव किमतीला ऑक्सिमीटर विकण्याचे प्रमाण मधल्याकाळात वाढले होते. परंतु कोरोनाच्या काळात फसवणुकीला बळी न पडता चांगल्या दर्जाचे ऑक्सिमीटर वापरावे असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. फसवणुकीला आळा घालण्यासाठी विक्रेते चांगल्या दर्जाच्या ऑक्सिमीटर विक्रीकडे आहगी असल्याचे दिसून आले आहेत.
—
आधीच मिळतो संकेत
ऑक्सिमीटरच्या मदतीने कोरोनाच्या प्राथमिक स्तराचे संकेत मिळतात. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यास किंवा कमी झाल्यास त्याचे संकेत तत्काळ मिळतात. श्वास लागण्यासारख्या प्राथमिक स्तराची माहिती मिळण्यास मदत होते.
—
शरीरातील ऑक्सिजन साधारणपणे ९५ ते १०० च्या दरम्यान असावा. रक्तातली ऑक्सिजन ९५ किंवा ९३ च्या खाली आल्यास तत्काळ रुग्णास हॉस्पिटलमध्ये हलवावे.
– प्रसाद धर्माधिकारी, डॉक्टर
—
गेल्या दोन महिनापासून ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाली आहे. हॉस्पिटल, छोटे दवाखाने तसेच घरगुती वापरासाठी ग्राहक ऑक्सिमीटरला पसंती देत आहेत. कोरोनाच्या काळात भारतीय बनावटीच्या ऑक्सिमीटरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
– गोरख चौधरी, होलसेल विक्रेते
—
निरनिराळ्या कंपनीचे ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. हॉस्पिटल तसेच लहान दवाखान्यापेक्षा घरगुती वापरासाठी प्राधान्य देत आहेत. घरातील सुरक्षेच्या दृष्टीने ग्राहक चांगल्या दर्जाचे ऑक्सिमीटर खरेदी करत आहेत. १००० रुपयांपासून चांगल्या दर्जाचे ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत.
– नितीन दहिवलकर, विक्रेते