रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑक्सिजन टँकर व सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

by India Darpan
सप्टेंबर 14, 2020 | 11:17 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200914 WA0019

नाशिक – कोरोना संसर्गाच्या रूग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याने तो रुग्णांना वेळेत मिळणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ऑक्सिजन टँकर व सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे, सदर वाहनांना रुग्णवाहिकेचे सर्व नियम लागू असतील, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत संबंधित विभागांच्या झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश भामरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नाशिक व मालेगाव महानगरपालिका, ग्रामीण भाग यांतील मोठ्या, मध्यम व लहान रुग्णालयात प्रतिदिवस सरासरी किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे, याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांनी प्रत्यक्ष वापराची माहिती घेऊन तांत्रिक माहिती बिनचूक रित्या संकलित करावी. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोयीचे होईल. जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवठा सर्व रुग्णांना योग्य प्रकारे होईल व त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हयगय होणार नाही याची दररोज खात्री करावी व दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राला पाठवावा असेही निर्देश यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले.
आपल्या जिल्ह्यातील वैद्यकिय क्षेत्राची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांची राहील. ऑक्सिजन तयार करणाऱ्या उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. त्याचप्रमाणे ज्या उद्योगांच्या ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आलेली आहेत अशा उद्योगांकडे परस्पर ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही याची सतत पडताळणी करीत राहावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सिजनसाठा किती आहे, तसेच ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न याबाबत अन्न व औषध विभागाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार यांनी बैठकीत माहिती दिली.
सद्य:स्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असून त्याचा पुरवठा सर्व रुग्णालयांना योग्यप्रकारे करण्यात येत असल्याची शहानिशा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी करावी व तसा दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राकडे द्यावा.
एकंदरीत ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय औद्योगिक वापरामध्ये समन्वय तसेच टँकर अथवा ऑक्सीजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनांची सुलभ वाहतुक या सर्व बाबींचे संनियंत्रण निवासी उपजिल्हाधिकारी सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती अत्यंत बारकाईने करेल अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कोविड विद्यार्थी पालक अभियान

Next Post

मराठा आंदोलकांना नोटिस; पोलिस आयुक्तांसमवेत बैठक

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मराठा आंदोलकांना नोटिस; पोलिस आयुक्तांसमवेत बैठक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011