लंडन – युनायटेड किंग्डमच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामड मंडळाने शिफारस केल्यामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात लस देण्यात आलेली व्यक्ती आजारी पडल्याने या लसीची चाचणी थांबविण्यात आली होती. त्याचबरोबर भारतातही सीरम इन्स्टिट्यूटनेही चाचण्या थांबविल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि अॅस्टाझेनेका यांनी तयार केलेल्या कोरोना लसीची चाचणी मानवी व्यक्तींवर केली जात आहे. ती तिसऱ्या टप्प्यात आहे. मात्र, आता परवानगी मिळाल्याने चाचणी पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, लस देण्यात आलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर काय आणि कसा परिणाम झाला याचे संशोधन सुरू झाले आहे.